मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर बोचर्या शब्दांत टीका केली आहे. महाजन यांच्यावर टीका करत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रात
शेतकरी, कष्टकरी
रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात
मराठी माणूस चिरडला जात आहे. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती पॉवर आज
फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने
अंगारे-धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही
आता सांगत असेल, माझे खुनी पकडू
नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे. ते आम्हाला
व्यक्तिशः प्रिय आहेत म्हणून हा प्रपंच अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी महाजनांवर
टीका केली आहे.
















